Ad will apear here
Next
फ्रान्स आणि जर्मनीचे लघुपट पाहण्याची संधी
येत्या १५ व १६ जून दरम्यान होणार लघुपट महोत्सव
‘इंटरनॅशनल शॉर्टस कलेक्टिव्ह’ महोत्सवाची घोषणा पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी केली. या वेळी केतकी राजवाडे, प्रकाश मगदूम, डॉ. पटेल, हायडी वेट्ज कुबाक व रेणू जामगांवकर आदी उपस्थित होते.

पुणे : पुणे फिल्म फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘इंटरनॅशनल शॉर्टस कलेक्टिव्ह’ या लघुपट महोत्सवात पुणेकर चित्रपट रसिकांना समीक्षकांनी गौरविलेले फ्रान्स व जर्मनी या देशांमधील लघुपट पाहण्याची संधी मिळणार आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा कर्टन रेझर अर्थात पूर्वपीठिका म्हणून या महोत्सवाचे आयोजन गोएथ इन्स्टिट्यूट मॅक्स म्युलर भवन, अलायन्स फ्रॅन्कॉईज आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय संस्था यांच्या वतीने करण्यात आले आहे.

‘शनिवार, दि. १५ जून व रविवार, दि. १६ जून, २०१९ दरम्यान कोथरूड येथील दूरदर्शन केंद्राजवळील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या सभागृहात हा महोत्सव होणार आहे. शनिवार दि. १५ तारखेला दुपारी चार ते नऊ आणि रविवार दि. १६ जून रोजी सकाळी १० ते दुपारी ३.३० अशी या महोत्सवाची वेळ असणार आहे. हा लघुपट महोत्सव १८ वर्षावरील सर्वांसाठी विनामूल्य खुला असणार आहे’, अशी माहिती पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष व पिफचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी अलियान्स फ्रान्सेजच्या कल्चरल कोओर्डीनेटर केतकी राजवाडे, गोएथ इन्स्टिट्यूट मॅक्स म्युलर भवनच्या संचालिका हायडी वेट्ज कुबाक व रेणू जामगांवकर व राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम देखील उपस्थित होते. 


या लघुपट महोत्सवाविषयी बोलताना डॉ. जब्बार पटेल म्हणाले, ‘पुणे फिल्म फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने गेली १७ वर्षे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. वर्षामधून एकदा होणारा हा चित्रपट महोत्सव चित्रपट रसिकांसाठी पर्वणी ठरत असला, तरीही वर्षभरातदेखील रसिकांना देश विदेशातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रपट, लघुपट पाहता यावेत व चित्रपट क्षेत्रातील जाणकार वाढावेत या उद्देशाने आम्ही ‘इंटरनॅशनल शॉर्टस कलेक्टिव्ह’ या लघुपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कर्टन रेझर अर्थात पूर्वपीठिका आम्ही करीत आहोत. अशा पद्धतीने वर्षभरात आम्ही दोन दिवसीय दोन कार्यक्रमांचे आयोजन करणार असून, त्याद्वारे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा जास्तीत जास्त रसिकांपर्यंत पोहोचून जाणकार रसिक प्रेक्षक तयार होतील असा आमचा विश्वास आहे.’

केतकी राजवाडे म्हणाल्या, ‘या महोत्सवात ट्रेस कोर्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविण्यात आलेले प्रत्येकी चार मिनीटांहून कमी वेळेचे तब्बल ६२ चित्रपट रसिकांना पाहता येतील. यामध्ये फिक्शन, अॅनिमेशन, डॉक्युमेंट्री यांसारख्या अनेक प्रकारच्या लघुपटांचा समावेश आहे. याशिवाय अलाईज फ्रॅन्कॉईजच्या वतीने  फ्रॅन्कोफोन चित्रपट महोत्सवातील फ्रेंच भाषेतील लघुपटदेखील या वेळी दाखविण्यात येतील.’  

महोत्सवातील जर्मन चित्रपटांविषयी बोलताना हायडी वेट्ज कुबाक म्हणाल्या, ‘महोत्सवात ‘दि बर्लिनाले स्पॉटलाईट’, ‘शॉर्ट एक्स्पोर्ट २०१८’, ‘शॉर्टफिल्म्स ऑन टूर’ या महोत्सवात दाखविण्यात आलेले तब्बल २० जर्मन लघुपट रसिकांना पाहता येतील. या लघुपटांच्या माध्यमातून जर्मनीतील जीवनाचे प्रतिबिंब रसिकांना पाहता येईल.

या वेळी बोलताना प्रकाश मगदूम म्हणाले, ‘रसिकांना दर्जेदार चित्रपट पाहता यावेत या उद्देशाने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय नेहमीच प्रयत्नशील असते. या लघुपट महोत्सवात दाखवण्यात येत असलेले लघुपट आंतरराष्ट्रीय स्तरावर समीक्षकांनी कौतुक केलेले असल्याने या माध्यमातून त्या दर्जाचे चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना मिळत असल्याचे समाधान आहे.’ 

(ही बातमी इंग्रजीतून वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZSSCB
Similar Posts
ऐतिहासिक सिमला परिषदेचे चित्रीकरण राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात पुणे : देशाच्या त्र्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील अनमोल खजिन्यात दुर्मीळ ठेव्याची भर पडली आहे. १९४५ मध्ये झालेल्या ऐतिहासिक सिमला परिषदेचे दुर्मीळ चित्रीकरण राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला प्राप्त झाले आहे. महात्मा गांधी, मौलाना आझाद, सी. राजगोपालाचारी असे दिग्गज या चित्रफितीत पाहायला मिळणार आहेत
महात्मा गांधींचे दुर्मीळ चित्रीकरण पाहण्याची संधी पुणे : महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात महात्मा गांधी यांचे दुर्मीळ चित्रीकरण दाखवण्यात येणार आहे.
‘पिफ २०१९’मध्ये सात मराठी चित्रपटांची बाजी पुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १० ते १७ जानेवारी २०१९ दरम्यान होणाऱ्या १७ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफ) मराठी चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागात यंदा सात चित्रपट निवडले गेले आहेत’, अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली
नृत्यविषयक ‘संचारी’ चित्रपट महोत्सवाचे आयोजन पुणे : नृत्यविषयक चित्रपट, लघुपट, माहितीपट यासह या क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधण्याची संधी येत्या शनिवारी,१६ फेब्रुवारी व रविवारी १७ फेब्रुवारी २०१९ रोजी पुणेकर रसिकांना मिळणार आहे. निमित्त आहे ‘कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘लाउड अॅपलॉज डान्स मॅगझिन’ प्रस्तुत ‘संचारी’ या दोन दिवसीय नृत्यविषयक चित्रपट महोत्सवाचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language